श्रुतीरुपी गोपींचे भ
162.
श्रुतीरुपी गोपींचे भगवंताशी निष्काम बुद्धीने अनुताप युक्त भाषण
आम्हावरी कांरे धरियेला राग । काय तुझे सांग आम्ही केले ॥१॥
रडतसो आम्ही मारितसो हांका । विश्वाच्या जनका नायिकसी ॥२॥
कामाग्नीने आम्ही जळतो सकळ । करावे शीतळ अधरामृते ॥३॥
नामा म्हणे देई एक वेळ भेटी । तुजसाठी कष्टी फार होती ॥४॥
