आकल्प आयुष्य व्हावे
885.
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळां| माझिया सकळा हरिच्या दासा ॥१॥
कल्पनेची बाधा न हो कोणे काळीं| हे संत मंडळी सुखी असो ॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा| माझ्या विष्णुदासा भाविकांसी ॥३॥
नामा म्हणे तया असावे कल्याण| ज्या मुखी निधान पांडुरंग ॥४॥
॥ पुंडलिक वरदे हरिविठ्ठल ॥
