वाजवोनी वेणू पसरिले
163.
वाजवोनी वेणू पसरिले जाळे । आम्हांसी न कळे कपटिया तू ॥१॥
दुखवोनी सर्वा टाकियेले वनी । गेलासी वधुनी पारधिया ॥२॥
धरूनिया धीर न राहावे कृष्णा । देऊ मग प्राणा सकळिका ॥३॥
सकळांच्या हत्या येती तुजवरी । नामा म्हणे हरि भेट आता ॥४॥
