नामेविण क्षण जाऊ नेद
237.
नामेविण क्षण जाऊ नेदी घडी ।
चित्तासी आवडी सर्वकाळ ॥१॥
भजन हे जया बोलिजे देवाचे ।
मने कायावाचे समर्पिले ॥२॥
संतसमागमी श्रवणाची आर्त ।
चित्ती अखंडित भाव असे ॥३॥
बहेणि म्हणे मन नेणे विषयसुख ।
नित्य ज्या हरिख नामपाठी ॥४॥
