व्हावे कथेसी सादर ।
15.
व्हावे कथेसी सादर । मन करुनिया स्थीर ॥1॥
बाबा काय झोपी जाता । झोले चौर्यांशींचे खाता ॥2॥
नरदेह कैसारे मागुता । भेटी नव्हे त्या सीताकांता ॥3॥
आळस निद्रा उटाउठी । त्यजा स्वरुपी घाला मिठी ॥4॥
जनी ह्मणे हरिचे नाम । मुखी ह्मणा धरुनि प्रेम ॥5॥
