तुम्ही ये तरी सांगा
3969.
तुम्ही ये तरी सांगा काही । आम्हाविशी रखुमाबाई ॥१॥
काही उरले ते ठायी । वेगी पाठवुनी देई ॥धृपद॥
टोंकत बैसलो देखा । इच्छीतसे ग्रासा एका ॥२॥
प्रेम देउनि बहुडा झाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥३॥
अर्थ :
हे रखुमाई, तुम्ही विठ्ठलाला आमच्या संदर्भात काहीतरी सांगा. जे काही उष्टांन्न त्यांच्याकडे उरले असेल तर ते तात्काळ आम्हाला द्यावे, असे सांगा. एकतरी घास मिळावा अशी अपेक्षा धरून मी बसलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विनंती केल्याबरोबर रुक्मिमी मातेने आम्हाला ब्रम्हरसाचे रुचक भोजन दिले. आता फक्त ‘विट्ठल-विट्ठल’ म्हणू.
