वाट पाहे वाहे निढळी
3970.
वाट पाहे वाहे निढळी ठेवुनिया हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलेसे चित्त ॥१॥
कई येता देखेंन माझा मायबाप । घटिका बोटे दिवस लेखी धरूनिया माप ॥धृपद॥
डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहे । मन उतावळि भाव सांडुनिया देहे ॥२॥
सुखसेज गोडचित्ती न लगे आणीक । नाठवे घर दार तहान पळाली भूक ॥३॥
तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येता मूळ देखेन ॥४॥
अर्थ :
मस्तकाला हाथ लाऊन मी विठ्ठलाची वाट पाहत आहे. माझी नजर आमी मन पूर्णपणे पंढरीच्या वाटेला लागले आहे. माझा मायबाप माझ्याकडे येत असलेला कधी एकदा पाहतो, असे मला झाले आहे. दिवस, घटका चालल्या आहेत. मी बोटावर त्याची मोजणी करीत आहे. दावा डोळा लावतो आहे, उजवा बाहू स्पुरून पाहतो आहे. देहभाव विसरून माझे मन उतावीळ झाले आहे. सुखाच्या अंथरुणावर अंग टाकले असता मन सुखावतनाही. घरदार नकोसे वाटत आहे. तहान-भूक हरपली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माला नेण्यासाठी पंढरीच्या वाटेवरून येणारे मूळ माझे आई बाप (विठ्ठल) कधी पाहीन? असा धान्य दिवस कधी उगवेल ?
