वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

झाला विरह हे नये देह

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089771 · अभंग क्र. १९३

193.
झाला विरह हे नये देहावरी ।
देता वोषधे वो आणिता पंचाक्षरी ।
देवि देवतांची नचले येथे थोरी ।
नाना उपायांच्या करिता भरोवरी वो ॥१॥
आण वेगिरी तो सावळा सुंदर ।
मदनमूर्ति वो नदाचा कुमर ।
तया भेटताचि होईल उतार ।
पुरेल आर्त हे वाचेल सुंदर वो ॥२॥
येकि सखिया त्या येउनि विनविती ।
येकि हरिचीया पायावरी लोळती ।
येकि करुनि पंचप्राणातिं आरती ।
म्हणति चला वेगी येकांता श्रीपति वो ॥३॥
येकी घालिती हरिसी विंझणवारा ।
येकि देति विडि त्या सुंदरा ।
येकि वारिती वरी चौया सकुमारा ।
ये म्हणति हरि चलावे मंदिरा वो ॥४॥
येकि देति चंदनाचि उटी ।
येकी लाविती कस्तुरिमळिवटी ।
ये घालिती त्या तुळसिमाळा कंठि ।
येकि म्हणती चलावे जगजेठी ॥५॥
ऐसा विनउलि आणिला ऐकोनि ।
जिविं ते सुखावलि बाळी ।
उठोनि सेजेवरी बैसली वेल्हाळी ।
निळयास्वामी तीचे आर्त पुरवि तये काळी वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग