वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

सहस्र दळ बिंदु त्यात

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075110 · अभंग क्र. ३८३

383.
सहस्र दळ बिंदु त्यात तेज दिसे ।
ते हो काय ऐसे सांगा मज ॥१॥
जेथ नाम रूप वर्ण नाही बा रे ।
ते हे रूप बारे चैतन्य बा ॥२॥
ज्ञानदेव म्हणे अनुभवाची खूण ।
जाणे तो सजाण अनुभविया ॥३॥

अर्थ :
सहस्रदळ बिंदुत योगी लोकांना जे तेज दिसते ते श्रीगुरूना शरण जाऊन मला त्या तेजाचा अनुभव सांगा अशी विनंती करून त्यांचेकडून समजून घ्यावे. ज्याला नाम, रूप, वर्ण हे काही नाही असे ते ब्रह्मस्वरूप चैतन्यच होय. या प्रमाणे त्या तेजांला जो यथार्थ अनुभवाने जाणेल तोच अनुभव घेतलेल्या योगी लोकांमध्ये शहाणा म्हणून मानला जाईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग