वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

गुजगुजीत रूप सांवळे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075088 · अभंग क्र. ३८२

382.
गुजगुजीत रूप सांवळे सगुण ।
अनुभविता मन वेडे होय ॥१॥
भ्रमर गुंफा ब्रह्मरंध्र ते सुरेख ।
पहाता कवतूक त्रैलोकी ॥२॥
आनंदस्वरूप प्रसिद्ध देखिले ।
निजरूप संचले सर्वांठायी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे या सुखाची गोडी ।
अनुभवाची आवडी सेवी रया ॥४॥

अर्थ :
भगवान श्रीकृष्णाचे शामसुंदर सुकुमार रूप पाहून मन वडे होऊन जाते हे रूप योग्यांना ब्रह्मरंध्रातील भ्रमर गुंफेत दिसते. ते पाहून त्यांना झालेला आनंद त्रैलोक्यात मावत नाही असे हे प्रसिद्ध आनंदमय दिसणार रूप आपली स्वरूपाहन भिन्न नाही. आत्मस्वरूप सर्वत्र भरले आहे. या सुखाची गोडी अनुभवानेच सेवन केली पाहिजे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग