कोणाचे हे रूप देह हा
384.
कोणाचे हे रूप देह हा कोणाचा ।
आत्माराम साचा सर्व जाणे ॥१॥
मी तू हा विचार विवेके शोधावा ।
गोविंद हा घ्यावा याच देही ॥२॥
ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा ।
सहस्रदळी उगवला सूर्य जैसा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नयनातील रूप ।
या नांव चित्पद तुम्ही जाणा ॥४॥
अर्थ :
माझ्या ठिकाणी दिसणारे रूप कोणाचे. देह कोणाचा हे सर्व त्या आत्मारामाला कळते. या देहांतच राहून मी कोण, तु कोण याचा न याच देहामध्ये त्याची प्राप्ती करून घ्यावी. तो परमात्मा ध्येय, ध्याता, व ध्यान या त्रिपुटीहन वेगळा असुन जणू काही सहस्रदळा किरणांनी सुर्यच प्रकाशित झाला आहे. नेत्रात दिसणारे रुप ते चित्सस्वरुपच आहे असे तुम्ही जाणुन घ्या. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
