लांब लांब काय सांगशी
1859.
लांब लांब काय सांगशील गोष्टी | करी उठाउठी निरभिमान ॥१॥
मीतूंपण जंव दंभ गेला नाही | साधिले त्वा न कांही तत्त्वसार ॥२॥
अहंभाव देही प्रपंचाचे दृष्टी | काय चाले गोष्टी रोकडी ते ॥३॥
नामा म्हणे ऐसे नेणती विचार | जाती निरंतर यमपंथे ॥४॥
