दावी जडीबुट्टी जारण
1858.
दावी जडीबुट्टी जारण मारण | नागवे हिंडणे काय काज ॥१॥
दावी उग्र तप केले उपवास | फिरतांहि देश काय काज ॥२॥
काय काज तरी होसील फजित | स्मरारे अनंत सर्वकाळ ॥३॥
नामा म्हणे नव्हे उदंड उपाय | धरी आधी पाय विठोबाचे ॥४॥