माझे अचडे बचडे छकुडे
338.
माझे अचडे बचडे छकुडे ग राधे रुपडे । पांघरु घाली ती कुंचडे ॥धृ0॥
हरि माझा गे सावळा । पायी पैंजण वाजे खुळखुळा । याने भुलविल्या गोपिबाळा ॥1॥
हरि माझा गे नेणता । करी त्रिभुवनाचा घोंगता । जो का नांदे त्रिभुवनी ॥2॥
ऐसे देवाजीचे गडी । पेंद्या सुदाम्याची जोडी । बळिभद्र त्याचा गडी ॥3
जनी म्हणे तू चक्रपाणी । खेळ खेळतो वृंदावनी । लुब्ध झाल्या त्या गौळणी ॥4॥
