आमच्या संसाराचा घेतल
10.
आमच्या संसाराचा घेतला असे भार । स्वामी विश्वंभरा पांडुरंगा ॥
तुझिया उपकाराच्या जाल्या बहुत रासी । त्या तुझ्या तू जाणसी कोणा सांगो ॥
त्रिभुवनी एक दाता तूचि गा समर्था । निवरिली व्येथा संसाराची ॥
ऐसा आम्हा दिना का केला अंगिकार । तू आमचे माहेर पांडुरंगा ॥
तू आमचा माता पिता सोयरा इष्ट बंधू । तुजसि समंधू आमचा देवा ॥
बोधला म्हणे तुज वाचुनी नेणे काही । चित्त तुझे पायीही बैसलेसे ॥
