आणीक ही मंत्र मोक्षद
662.
आणीक ही मंत्र मोक्षदानी खरे | अशौचाचा थार असू नये ॥१॥
नाममंत्र काही बाधेना कोणासी | जया अहर्निशी रामकृष्ण ॥२॥
तपाची मांडणी आकाशाचे खेव | इंद्रियांची हाव राहे तरी ॥३॥
यज्ञ तो आचार धनाचे साकडे | तरी जाण द्वाड स्वर्गसुख ॥४॥
नामा म्हणे नाम साधकाची माता | जैसे तैसे घेता भक्ति जोडे ॥५॥
