नामचि तो जाणे आन काह
663.
नामचि तो जाणे आन काही नेणे | संसार नामाविणे जाईजेना ॥१॥
नाम स्मरे त्यासी संसारचि नाही | खुंटली ते पाही वेरझार ॥२॥
नामा म्हणे त्याचे जळो जालेपण | आळसी वायाविण संसाराची ॥३॥
नामा म्हणे मज नामीच सौरसु | नाम स्मरे हृषिकेशु त्यासी पावे ॥४॥
