वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

अद्वैत अमरकंदु हा घड

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090040 · अभंग क्र. १०५

105.
अद्वैत अमरकंदु हा घडला । ब्रह्मांडी संचला ब्रम्हसाचे ॥१॥
ते रूप कारण कृष्ण तेजाकार । सर्व हा आकार त्याचा असे ॥२॥
विराट विनटु विराट दिसतु । आपणचि होतु ब्रम्हसुख ॥३॥
निवृत्ति कोवळे आपण सोविळे । त्यामाजी वोविले मन माझे ॥४॥

अर्थ:
त्या ब्रह्मांडाला व्यापुन राहिलेली आपल्या अद्वैत व अमरत्वाने ब्रह्मत्व घेऊन आलेला हा जगताचा ठेवा आहे. जगताचे सर्व आकार आपल्या अंगे दाखवणारा हा जग निर्मिती करणारा कृष्णच आहे. अत्यंत विराटरुप जगतस्वरुपात निर्माण करणारा तेच विराट रुप आपल्या अंगात बाळगुन आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या पवित्र, कोवळ्या व सर्वापासुन वेगळ्या असणाऱ्या रुपाने माझे मन बांधले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग