वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

निरपेक्षता मन अनक्षर

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090105 · अभंग क्र. १०४

104.
निरपेक्षता मन अनक्षर मौन्य । प्रकाश संपूर्ण तया ब्रह्मा ॥१॥
ऐसे रूप पाहा क्षरे दिशा दाहा । सर्वभावे मोहा एका कृष्णा ॥२॥
नित्यता अढळ नित्यपणे वेळे । विकाश आकळे नित्य तेजे ॥३॥
रूपस सुंदर पवित्रआगर । चोखाळ साकार पवित्रपणे ॥४॥
नेणे हे विषय आकार न माये । विकार न साहे तया रूपा ॥५॥
निवृत्ति तत्पर कृष्ण हा साकार । ऊँतत्सदाकार हरि माझा ॥६॥

अर्थ:
सर्व ब्रह्मांडात प्रकाश आहे. तो प्रकाश निरपेक्ष आहे काही न बोलता तो जगताला प्रकाशीत करत असतो. असे जे प्रकाशमय ब्रह्म कृष्ण रुप घेऊन आले असलेल्या मुळे तेच रुप दशदिशा व्यापुन टाकत आहे. ते प्रकाशरुप ब्रह्म आपल्या स्वरुपात कोणताही बदल न करता नित्य प्रकाश देण्याचे कर्म करत आहे.जे रुप प्रसंगानुसार शुध्द व निर्दोष रुप घेते ते सुरेख असुन सर्व शुध्दतेचा जनक आहे. कोणता ही विकार नसलेले ते अकार नसलेले रुप निर्गुण प्रकाशमय आहे. निवृत्तिनाथ म्हणतात,ज्या ब्रह्माचे स्वरुप ॐ तत् सत् असे आहे तोच कृष्णरुप घेऊन साकारला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग