करिता उसी हाता नये च
234.
करिता उसी हाता नये चेंडु गमाविला ।
धरुनि कानिं पाठिवरी बैसविती मुला ॥१॥
म्हणती म्हणे कीर ।
नाहीतरी घेई फेर ॥२॥
अधिके अधिक्वरि साया घेऊ येती ।
गमाविता चेंडु हाल अवघेचि पहाती ॥३॥
निळा म्हणोनिया लावि लक्षडोळा ।
देईल हाती चेंडु हरि कृपेचा कोवळा ॥४॥
