परधन कामिनी समूळ नाण
162.
परधन कामिनी समूळ नाणी मना । नाही हे वासना माया केली ॥1॥
तृष्णा हे अधम न व्हावी मजला । प्रेमाचा जिव्हाळा देंई तुझ्या ॥2॥
निरपेक्ष वासना देगा मज देवा । आणि तुझी सेवा आवडीची ॥3॥
शांतीची भूषणे मिरविती अंगी । वैष्णव आणि योगी ह्मणावे ते ॥4॥
असो तो अकुळी असो भलते याती । माथा बंदी प्रीती जनी त्यासी ॥5॥
