रुक्माई आईचे आहे ऐसे
161.
रुक्माई आईचे आहे ऐसे भाग्य । असावे आरोग्य चिरकाळ ॥1॥
सख्या पुंडलिका आवडते स्थळ । असावे चिरकाळ स्वस्ति क्षेम ॥2॥
अहो संतजन घ्या आवडते धन । असावे कल्याण चिरकाळ ॥3॥
जन्मोजन्मी हेचि मागे गोविंदासी । म्हणे जनी दासी नामयाची ॥4॥
