पांडुरंगे पांडुरंगे
587.
पांडुरंगे पांडुरंगे ।
वेगी येंई माझे गंगे ॥१॥
तुजवाचूनि मजला ।
कोण सांभाळी दयाळा ॥२॥
तूचि आमुचा आधार ।
धावूनि येंई बा सत्वर ॥३॥
निळा म्हणे पांढुरंगा ।
घेई बाळा तू वोसंगा ॥४॥
587.
पांडुरंगे पांडुरंगे ।
वेगी येंई माझे गंगे ॥१॥
तुजवाचूनि मजला ।
कोण सांभाळी दयाळा ॥२॥
तूचि आमुचा आधार ।
धावूनि येंई बा सत्वर ॥३॥
निळा म्हणे पांढुरंगा ।
घेई बाळा तू वोसंगा ॥४॥