मुख सुंदर मंडित साजि
645.
मुख सुंदर मंडित साजिरा । विंझणे वारिती राहिरखुमाई सुदरां ॥१॥
नवल वो हरी देखिला डोळा । पाहता पाहता मन विराले अबळा ॥२॥
नेणे तहान भूक लज्जा अपमान । वेधिलें देवकीनंदनें गे माय ॥३॥
एका जनार्दनी पाहता मुख । मुख पाहता अवघे विसरलो दुःख ॥४॥
