प्रेमभावे तुह्मी नाच
150.
प्रेमभावे तुह्मी नाचा । रामरंगे रंगो वाचा ॥1॥
हेचि मागो देवाजीला । आवडी शांती खरे बोला ॥2॥
जैसी माय तान्हयाते । खेळउनी चुंबी त्याते ॥3॥
तेवि तुह्मी संतजना । सर्वी धरावी भावना ॥4॥
हरि कोठवळा झाला । म्हणे जनी भक्ती केला ॥5॥
