अंतःकरणी विष्णु तोचि
2100.
अंतःकरणी विष्णु तोचि आत्मा असे | चंद्रमा भासे मन तेंची ॥१॥
बुद्धि ब्रह्मदेव चित्ते नारायण | अहंकार जाण रुद्ररूप ॥२॥
ज्ञान आत्मे पांच ज्ञानी ओळखावे | पांच ते पाहावे कर्मस्थानी ॥३॥
नामा म्हणे केसे दाखऊ उघडे | वाटतसे कोडे मज आता ॥४॥
