षडचक्र भेदोनी जाता उ
2101.
षडचक्र भेदोनी जाता उध्वेपंथे | ध्वनि अनुहात उमटे तेथे ॥१॥
तये ध्वनीमाजी भग्न होय मन | योगसिद्धि जाण क॑सी घडे ॥२॥
तेहि वोलांडिता सिद्धि आडव्या येती | घेऊनिया जाती आपुल्या पंथे ॥३॥
तेथे गुंतोनिया विचरती योगीजन |. योगासी साधून काय होते ॥४॥
आधि तो साधिता कष्टाचे संभार | होय चकनाचूर शरीराचा ॥५॥
साधितिया पुढे ऐसी विध्ते येती | ठेऊनि मागुती फिरती मागे ॥६॥
वारियाची मोट केसी बांधवेल | भलत्यासी सांगता वाटेल हे लटिके ॥७॥
नामा म्हणे तुम्ही सोंडोनिया भक्ति | करिता नामा युक्ति मूर्खजन ॥८॥
