दृष्टीचे देखणे तेंचि
2099.
दृष्टीचे देखणे तेंचि रूप माया. | शब्दे बोलावया ज्ञान जाले ॥१॥
ज्ञानाची जी जागा हृदयी पाहावी | सत्रावीसी दावी खळ तेथे ॥२॥
सत्रावी जीवन माया' तिचे पोटी | ज्ञान जाली दृष्टी देखावया |॥३॥
देखणे सिद्धांत बोलणे वेदांत | शब्द तोचि हेत संत्रावीचा ॥४॥
नाद आणि भेद देखणे सिद्धांत | बोलणे वेंदांत हेचि दोनी ॥५॥
हेत तो अहंकार दोहींते नाचवी | अविद्येसी दावी निजसुरा ॥६॥
नामा म्हणे सिद्ध देखणे हा जन्म | डोळयामाजी 'वर्म बोलिले ते ॥७॥
