त्रिविधतापे प्राणी ह
164.
त्रिविधतापे प्राणी होताती संतप्त । शीतळ करीत कथामृते ॥१॥
अमृतापरीस तुझी कथा अधिक । सांगतसे ऐक देव- राया ॥२॥
स्वर्गी जे अमृत प्राशन करिती । पुण्य सरल्या येती मृत्यु लोका ॥३॥
तुझी कथा देत अच्युत पदासी । न विचारी मा-नसी याति कांही ॥४॥
नाही चतुराई बोबडे हे बोल । संतोषे विठ्ठल नामा ह्मणे ॥५॥
