वडील कुरंगी काय बोले
595.
वडील कुरंगी काय बोले त्यासी| सांगते धर्मासी पूर्वीलिया ॥१॥
बांधोनि मारिता घडे महादोष| पाजी उदकास सोडोनिया ॥२॥
पिऊनिया जळ येऊ तुजपाशी| मग सावकासी करी काज ॥३॥
आमुचा विश्वास नाही तुजवरी| मागसी त्यापरी भाक देऊ |॥४॥
पर उपकारी पडतसे देह| लोभ आता काय वांचुनिया ॥५॥
भुकेलिया अन्न तान्हेल्या जीवन| पुण्यासी कारण इतुकेंची ॥६॥
पांचजणी तुज वोपीयेले देह| यालागी संदेह न धरावा ॥७॥
नामा म्हणे ऐसा प्रार्थिता किरात| द्रवला मनात काय बोले ॥८॥
