वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

अद्वैत येणे अद्वैतपण

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074326 · अभंग क्र. ६९५

695.
अद्वैत येणे अद्वैतपणे सांडिले ।
थिते होते ते माझे लया पै गेले ॥१॥
नाही तेचि पाहावया वायांवीण गेले ।
तव पाहाणेंचि जाले बाईये वो ॥२॥
बापरखुमादेविवरू जुनाट जुनघडा ।
तोहि म्या सांडिला अरूपसंगे ॥३॥

अर्थ :
येणे म्हणजे या अद्वैत परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी अद्वैतपणाही राहिला नाही त्यामुळे माझी जी देहात्मस्थिती होती ती लयाला गेली. मन, बुद्ध्यादिकांना जे विषय नाही. ते परमात्मतत्त्व सहज पहावयास गेले. तो ज्याला पहावयास गेले ते परमात्मतत्त्वच मी होऊन गेलें. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, अनादि जुन्यातला जुना असा जो परमात्मा त्याचाही मी संबंध टाकून दिला. याचा अर्थ देवाच्या ठिकाणचा देवपणा व जीवांच्या ठिकाणचा जीवपणा हे दोन्हीही भावा टाकून देऊन देवरूप झाले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग