वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

नसतेचि दोष आरोपिती स

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075974 · अभंग क्र. ३९९

399.
नसतेचि दोष आरोपिती संता ।
जाती अधःपाता रौरवासी ॥१॥
जन्मोजन्मी किडे विष्ठेतील होती ।
क्षण एक विश्रांती नाही जीवा ॥२॥
कन्याविक्रयाचा दोष तोही थोडा ।
करिती जे पीडा साधकांसी ॥३॥
सहस्त्र वधिता गाई तेही पाप थोडे ।
निंदा संती जोडे अगणित ॥४॥
पिता-माता-वद करू बापा सुखे ।
दोष हे विशेष संतनिंदे ॥५॥
देउळे मोडिती अग्रहारे जाळिती ।
तेही दोष जाती क्षणमात्रे ॥६॥
परी संतनिंदा-दोष न जाय सर्वथा ।
नेतो अधःपाता ब्रह्मादिका ॥७॥
बहेणि म्हणे संतनिंदेने अभक्ता ।
रविशशी भ्रमत तोवरी पीडा ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग