स्वधर्मे आपुल्या असत
400.
स्वधर्मे आपुल्या असता स्वगृही ।
कोन्ही निंदा पाही करू नये ॥१॥
निम्दिता तयाचा शस्त्राविण वध ।
केला हा वेवाद वेदमुखे ॥२॥
जेणे वाचे निंदा करावी संतांची ।
तये वाचे यमाची सुरी वाहे ॥३॥
जये वाचे निंदा वाकुल्या दाखवी ।
ते वाचा रौरवी पचे खरी ॥४॥
जया मुखे शिव्या द्यावा संतवृंदा ।
तया वाचे आपदा नानापरी ॥५॥
बहेनि म्हणे यासी नव्हे अप्रमाण ।
वेदाची हे खूण सत्य बापा ॥६॥
