जया कारणे योगयोग तपे
625.
जया कारणे योगयोग तपें करती । ती हे उभी बाळ विठ्ठल मूर्तीं ।
अंगी तेजाची न माय दीप्ती । कंठी वैजयंती शोभती गे माया ॥१॥
त्याचा वेधु लागला जीवी । क्षण परता नोहे देही ।
काया वाचा मने भावी । वेगे वेधकु गे माये ॥२॥
ने माये त्रैलोकीं तो उभा विटों । दोन्ही कर समपदे ठेवुनी कटी ।
सर्वांगी चंदन कस्तुरी उटी । अवामभागी रुक्मीणी गोमटी गे माय ॥३॥
ऐसा सर्व सुखाचा आगरु । उभारुनि बाह्मा देत अभयकरु ।
एका जनार्दनी निर्धारु । विठ्ठलराज गे माय ॥४॥
