उतावेळपणें उभा । त्र
624.
उतावेळपणें उभा । त्रैलोक्य शोभा पंढरीया ॥१॥
मना छंद घेई वाचे । विठ्ठल साचे पाहुं डोळा ॥२॥
गळा तुळशीच्या माळा । केशर टिळा लल्लाटी ॥३॥
चंदनाचे शोभे उटी । वैजयंती कंठी मिरवत ॥४॥
दाष्टी धाय पाहता रुप । एका जनार्दनी स्वरुप ॥५॥
