अणुरेणु पासोनि ब्रह्
626.
अणुरेणु पासोनि ब्रह्मांडी भरला । तो म्या देखिला विटेवरी ॥१॥
स्थावर जंगम भरुनी उरला । तो म्या देखिला पंढरीये ॥२॥
वेदशास्त्र पुराणे गाती जयासाठी । तो पुंडलिका पाठी उभा दिसे ॥३॥
वेडावल्या श्रुति न कळे म्हणती । तो उभा श्रीपती वाळुवंटी ॥४॥
संताचा समागम गाती आनंदानें । तो हरी कीर्तने नाचतसे ॥५॥
एका जनार्दने सुखाचा सागरु । विठ्ठल कल्पतरु वोळला आम्हा ॥६॥
