नंदस्थिती
204.
नंदस्थिती
धांवोनिया नंदे धरिले चरण । घालूनि आसन बैस-विला ॥१॥
सुकुमार सांवळा राजीवलोचन । सुखी आहे कृष्ण मथु-रेंत ॥२॥
रोहिणीचा पुत्र सखी आहे राम । स्मर्रे पुरुषोत्तम कधी आह्मा ॥३॥
गोकुळांत गौळी आहे एक नंद । आठवी गोविंद कधी तरी ॥४॥
काय माझे पुण्य उद्धवा सरले । ह्मणोनि टाकिले कृष्ण-नाथे ॥५॥
परब्रह्म पूर्ण धाडी मी वनासी । ह्मणोनी ह्लषिकेशी को-पलासे ॥६॥
मेघ:श्याम मूर्ति सकुमार पाउले । न देखती डोळे आता माझे ॥७॥
ऊठ नंदा जेऊ कोण ह्मणे आता । दु:ख माझ्या चित्ता फार वाटे ॥८॥
नेत्री अश्रुधारा कंठ सद्नदीत । पडीला मूर्च्छित नामा ह्मणे ॥९॥
