वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

ऐके वचन कमळापती । मज

🙏 3. संत तुकाराम · ABH-079504 · अभंग क्र. ३९८४

3984.
ऐके वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥१॥
कर जोडितो कथेकाळी । आपण असावे जवळी ॥धृपद॥
घेई ऐसी भाक । मागे न जरि काही एक ॥२॥
तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाचि राखावा ॥३॥

अर्थ :
हे कमळापती माझे एक वचन तुम्ही ऐका माझी रंकाचीही तुम्हाला विनंती आहे. हरीकथेच्या काळी मी तुम्हाला हात जोडीत आहे कृपया करुन तुम्ही माझ्या जवळच असावे असे मला वाटत आहे. मी तुम्हाला परत काहीही मागणार नाही असे तुम्ही माझ्याकडून वचन घ्यावे. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात की, देवा इतकाच माझा शब्द तुम्ही राखावा म्हणजे झाले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग