वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

आली लळिताची वेळ । अस

🙏 3. संत तुकाराम · ABH-079343 · अभंग क्र. ३९८५

3985.
आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥१॥
लाहो करा वेगी स्मरा । टाळी वाहुनि विश्वंभरा ॥धृपद॥
झालिया अवसान । न संपडती चरण ॥२॥
तुकयाबंधु म्हणे थोडे । अवधि उरली आहे पुढे ॥३॥

अर्थ :
आता तुमची फजितीची वेळ आलेली असून तुम्ही सर्वजण सावध राहा. विश्वंभराची प्राप्ती करुन घेण्यासाठी तुम्ही त्वरेने प्रयत्न करा आणि हाताने टाळी वाजवा. एकदा की तुमचा देह शक्तीहीन झाला तर नंतर त्याला हरीचे चरण सापडणार नाही. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात, आता पुढे अगदी थोडासाच वेळ उरलेला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग