घरही झाडणे साळीहि का
288.
घरही झाडणे साळीहि कांडणे । केर तो भरणे अंगणीचा ॥१॥
आणितसे पाणी वेगे चक्र पाणी । घालितसे वेणी आपुले हाते ॥२॥
बैसोनी निवांत पाहांत केशांत । उवा तो मारीत लाहे लाहे ॥३॥
चोखा म्हणे हे तो प्रेमाचे काज । न धरी कांही लाज थोरवीची ॥४॥
