वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(निर्याणाचे अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079500 · अभंग क्र. ३६०९

3609.
(निर्याणाचे अभंग)
घोंटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हाती । मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ॥१॥
ब्रम्हीभूत काया होतसे कीर्तनी । भाग्य तरी ॠणी देवा ऐसा ॥धृपद॥
तीर्थ भ्रामकासी आणीन आळस । कडु स्वर्गवास करिन भोग ॥२॥
सांडवीन तपोनिधा अभिमान । यज्ञ आणि दान लाजवीन ॥३॥
भक्तीभाग्यसीमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मींचा जो अर्थ निजठेवा ॥४॥
धन्य म्हणवीन येह लोकी लोका । भाग्य आह्मी तुका देखियेला ॥५॥

अर्थ :
मी इतके रसपूर्ण व चांगले हरीचे किर्तन व भजन करीन की ब्रम्हज्ञानी मनुष्याला देखील लाळ घोटण्यास प्रवृत्त करेल मुक्त आत्मस्थिती सोडून भक्ती करण्यास तो आपोआप प्रवृत्त होईल. कारण किर्तनामध्ये शरीर ब्रम्हीभूत अवस्थेला प्राप्त होते आणि देव आपला ऋणी होतो असे भाग्य आपले तयार होते. मी हरी किर्तनाचा महिमा एवढा वाढवेल की तीर्थयात्रा करणाऱ्यांना देखील त्या गोष्टीचा आळस येईल आणि इंद्रादिक देवांना स्वर्गवास भोग देखील कडू वाटू लागेल. तपश्चर्‍या करणाऱ्या तपोनिधीला देखील मी अभिमान सोडायला लावीन व यज्ञ आणि दान या साधनांना देखील लाजवीन. भक्तीभाग्य आणि चार पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांना मी प्राप्त करुन घेईन आणि ब्रम्हीचा जो निजठेवा तो प्राप्त करुन घेईन. तुकाराम महाराज म्हणतात, मी असे काही कर्तव्य करीन की या इहलोकामध्ये ज्यांनी कोणी मला पाहिले आहे ते म्हणतील की आमचे भाग्य आहे की आम्ही श्री तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष आमच्या डोळयांनी पाहिले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग