वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(निर्याणाचे अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079839 · अभंग क्र. ३६०८

3608.
(निर्याणाचे अभंग)
म्हणवितो दास । परि मी असे उदास ॥१॥
हाचि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥धृपद॥
सरते कर्तुत्व माझ्याने । परि मी त्याहून असे भिन्न ॥२॥
तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥३॥

अर्थ :
मी स्वत:ला हरीचा दास म्हणून घेतो परंतू मी फार उदास आहे. हाच माझा निश्चय आहे परंतू निश्चयापेक्षाही मी वेगळा होऊन राहिलो आहे. माझ्याकडून कर्तृत्व तर घडते परंतू त्या कर्तृत्वापेक्षाही मी भिन्न आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी परब्रम्हाच्या तुलनेला येऊन पोहोचलो आहे ही गोष्ट खरी असली तरी देखील जिथे तुलना हा प्रकारच नाही त्याच स्थितीत मी जाऊन पोहोचलो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग