तेरा जन्म तुज सांगित
167.
तेरा जन्म तुज सांगितले आज ।
दृश्य माझे मज सर्व होती ॥१॥
आज याचि परी समयो जाणोनी ।
तुज रे निर्वाणी सांगितले ॥२॥
अठरा दिवस मृत्यू पुढे कळो आला ।
परि नाही सांगितला ऐक सांगो ॥३॥
रूक्मिणीसी आधी मृत्यु जाल्यावरी ।
जाए गोदावरी उतरकार्या ॥४॥
अठरा दिवस मृत्यु जाला अगोदर ।
रुक्मिणी सादर पतिव्रता ॥५॥
माझा मृत्यु तुज सांगताचि खेद ।
नवजेसी गोदे क्रियाकर्मा ॥६॥
यालागी रे अंत सांगितला नाही ।
धरूनी हृदयी सावधान ॥७॥
तुज गेलियाने नागरिका सर्वा ।
सांगितला भाव अंतरीचा ॥८॥
तेरावा दिवस रूक्मिणीचा जेव्हा ।
तुम्ही पत्र तेव्हा पाठवावे ॥९॥
पाच दिवस मृत्यू तेथोनी उरला ।
हेत सांगितला नागरिकांसी ॥१०॥
आठविली ते ते लिहिविली पदे ।
पाहोनिया शुद्ध लिही पुढे ॥११॥
बहेणि म्हणे देवबोलवी जे वाणी ।
असत्य जो मानी नरक तया ॥१२॥
