कोटी कंदर्पांच्या श्
1861.
कोटी कंदर्पांच्या श्रेणीं । कुर्वडींतक जनार्दनी ॥१॥
बरवा जनार्दनी जनी । पाहता तनुमन भुलवणी ॥२॥
नयन लाचावले दोन्ही । आन न दिसे त्रिभुवनी ॥३॥
शंकरासी झाला गोड । काय इतरांचा पाड ॥४॥
रूपा भाळला कंदर्प । तेणे कृष्ण केला बाप ॥५॥
रमा रमणीये सर्वांसी । झाली चरणाची दासी ॥६॥
सनकादिक अति विरक्ति । तेहि हरिपदी आसक्त ॥७॥
जनी जनार्दन नेटका । एकाएकी चरणी देखा ॥८॥
