वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

नवल हे कृपा घनवट ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088579 · अभंग क्र. १५१३

1513.
नवल हे कृपा घनवट ।
उडवूनी मायेचे फळकट ।
आप आपणा केले प्रगट ।
मोडिली वाट दुसयाची ॥१॥
आपणासवे आपण खेळे ।
आपआपणासी चावळे ।
शेखी आपण आपणा मिेळे ।
खेळता वेगळे दाउनि ॥२॥
ऐसा आपुलिया संतोषा ।
एकी भिन्नत्वाची आशा ।
अनेकत्वाचा मिरउनी ठसा ।
एकी येकला शेवटी ॥३॥
दाऊनिया नानाकार ।
नानाकृति नारीनर ।
तेचि करुनिया निराकार ।
आपणाअंगी आपण ॥४॥
निळा म्हणे कृपातरणी ।
प्रगटोनिया माझिये वाणी ।
प्रकाशी आपुला किणी ।
लाविली गुणी वर्णावया ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग