वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 128. बागुल

बागुल

🙏 4. संत नामदेव · ABH-083176 · अभंग क्र. २८९

289.
बागुल

पहिला बागुल तो ऐसा | त्याचे नाव म्हणती मासा |शंखासुर बधिला कैसा | चारी वेद आणिले ॥१॥
कृष्णा राहे रे उगला | नाही तर सांगेन त्या बागुला |घुसळणाशी उशीर जाला | रवी सोड गोविंदा ॥धृ.॥
दुसरा बागुल बोलती | नाम कासव म्हणती |जेणे सृष्टी धरिली पृष्ठी | पाय पोटी सुदले ॥कृष्णा. २॥
तिसरा बागुल बोलती | नाम वराह म्हणती |जेणे दाढे धरिली क्षिती | दैत्य थोर मारिले ॥कृष्णा. ३॥
चवथा बागुल नरहरी | थोर खांबात गुरगुरी |दैत्य वधोनि मांडीवरी | भक्त प्रल्हाद रक्षिला ॥कृष्णा. ४॥
पाचवा बागुल ब्रह्मचारी | उभा असे बळीचे द्वारी |भिक्षा त्रिपांड धरित्री | बळीचे द्वार रक्षिले ॥कृष्णा. ५॥
सहावा बागुल बोलती | नाम परशुराम म्हणती |ज्याने वधिले माते प्रती | पितृप्रेम मानुनी ॥कृष्णा. ६॥
सातवा बागुल सत्वाचा | राम म्हणती दशरथाचा |रावण वधोनि दशमुखाचा | जानकीसी आणिले ॥कृष्णा. ७॥
आठवा बागुल बोलती | गोकुळी थोर आहे ख्याती |त्याने वधिले कंसाप्रति | देव सुखी केले ॥कृष्णा. ८॥
नववा बागुल बोलती | नाव बौद्ध म्हणती |कोणा न कळे त्याची गती | बौद्ध रूपे राहिला ॥कृष्णा. ९॥
होता कलंकीचा रथू | वेगी येई बा धावतु |नामा म्हणे पंढरीनाथु | बागुल तू जालासी ॥कृष्णा. १०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग