वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(आरत्या)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079498 · अभंग क्र. ४०८९

4089.
(आरत्या)
कनकाच्या परियेळी उजळूनि आरती । रत्नदीप प्रभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥
ओंवाळू गे माये सबाह्य साजिरा । राहिरखुमाईसत्यभामेच्या वरा ॥धृपद॥
मंडितचतुर्भुज दिव्य कानी कुंडले । श्रीमुखाची शोभा पाहाता तेज फांकले ॥२॥
वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधे शोभत ॥३॥
सांवळा सकुमार जैसा कर्दळीगाभाचा । चरणीची नेपुरे वांकी गर्जती नभा ॥४॥
ओंवाळिता मन हे उभे ठाकले ठायी । समदृष्टि समान तुकया लागला पायी ॥५॥

अर्थ :
सोन्याच्या ताटामध्ये आम्ही ज्योती पेटवल्या आहेत व आरतीचे ताट तयार केले आहे त्या ज्योतींची प्रभा रत्नदीपाप्रमाणे आणि कशी प्रकाशीत झाली आहे ते पाहा या राही रुक्माबाई सत्यभामेच्या पतीला जो आतर बाह्य अतिशय साजिरा आहे त्याला ओवाळू चला. हरीचे चतुर्भूज रुप तसेच कानामध्ये दिव्य कुंडले हे साजिरे रुप अतिशय शोभून दिसत आहे हरीच्या आणि हरीच्या श्रीमुखाच्या शोभेचे तेज सगळीकडे पसरलेले दिसत आहे. सर्व श्रीमंत सर्वात ऐश्वर्यवान असलेला देव त्याच्या गळयामध्ये वैजयंती माळ अतिशय शोभून दिसत आहे तसेच शंख चक्र पद्म गदा ही आयुधेही त्याच्या हातामध्ये शोभत आहेत. हरीची काया ही सावळी सुकूमार आहे जणू केळीचा गाभाच आहे त्याच्या पायातील घाग-या वाळे पैंजण हे रुणझुण वाजत असून आकाशात गर्जत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या हरीचे दोन्ही पावलेही समान आहेत ज्याची समदृष्टी आहे जो विटेवर उभा आहे त्या हरीची आरती ओवाळण्याकरता माझे मन स्थिर झाले आहे व मी त्याच्या पायी नमस्कार घातला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग