वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(आरत्या)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079760 · अभंग क्र. ४०८८

4088.
(आरत्या)
सुकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ ।
झळकति दिव्य तेजे दंत माज पातळ । मिरविती मयुरपत्रे मुगुट कुंडले माळ ॥१॥
जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमाईवरा । आरती करीन काया । ओंवाळिन सुंदरा । जय. ॥धृपद॥
गोजिरे ठाणमाण भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी ।
हृदयी ब्रम्हपद बाणले शृंगारी । गर्जति चरणी वांकी कंठ कोकिळस्वरी ॥२॥
घवघवित उटी अंगी बावन चंदनांची । लल्हाटी कस्तुरिचा कास पितांबरीची ।
कटिसूत्र वरी साजिरे प्रभा वर मोतियांची । संगीत सकळ मुद्रा पाउले कुंकुमाची ॥३॥
सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सल विश्व लाविले ध्यानी ।
आश्चर्य देव करिती ॠषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥४॥
वर्णिता ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती ।
उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूर्ती । तुकयाबंधु म्हणे स्तवू मी काय किती ॥५॥

अर्थ :
हरीचे मुख सुकुमार असून कमळासारखे आहे हरीचे नीजस्वरुप अगदी निर्मळ आहे हरीचे शरीर सावळे, सुनीळ असून केस कुरळे आहेत. देवाचे दात अतिशय हि-यासारखे चमकत असून तेज दिव्य आहे देवाचे कमर पातळ आहे आणि मुकूटावर मोरपीस असून कानात मत्सयकुंडले आहेत व गळयात माळ अतिशय शोभून दिसत आहे. हे सर्वसुंदरा, जगदीश्वरा, रुक्माईवरा तुम्ही धन्य आहात मी माझ्या शरीराची कुरवंडी करुन तुमची आरती ओवाळीन. देवा तुझे चतुर्भूज आकृती ही अतिशय शोभून दिसत असून शंख, चक्र, पद्म, गदा व पावा तुझ्या हातामध्ये शोभून दिसत आहे. देवा तुमच्या ह्दयावर श्रीवत्सलांछन अतिशय साजिरे दिसत आहे तुम

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग