(व्यभिचारिणी स्त्रीच
3433.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
हासो रुसो आता वाढवू आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥
सेवासुखे करू विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकी ॥२॥
तुका म्हणे आम्ही झालो उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥३॥
अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)आम्ही देवाशी आता हसू वेळप्रसंगी त्याच्यावर रुसू परंतू त्याच्याविषयी अंतरंगामधे अवीट गोडी व आवड वाढवू. ती चित्तरुपी स्त्री पुढे म्हणते की आम्ही नारायणाशी एकातात बसून गप्पा मारु त्याची सेवा करु विनोद करु व सुख भोगू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या देहाविषयी व संसाराविषयी उदासीन झालो आहोत त्या योगाने तर आम्ही आमच्या पतीला म्हणजे नारायणाला आमच्या आधीन केले आहे.
