वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(व्यभिचारिणी स्त्रीच

🙏 3. संत तुकाराम · ABH-080441 · अभंग क्र. ३४३२

3432.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
एका जिवे आता जिणे जाले दोही । वेगळीक काही नव्हे आता ॥१॥
नारायणा आम्हा नाही वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥
तुका म्हणे झाले सायासाचे फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥

अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)देव आणि मी जरी दिसायला भिन्न असलो तरी आम्ही दोघेही एकाच जीवाने जगत आहोत आता आमच्यामध्ये भेद पुन्हा कधीही राहाणार नाही. नारायणाने पूर्वी गीतेमध्ये असे वचन सांगितले आहे की, तो त्याच्या भक्तांना त्याच्या स्वरुपापेक्षा भिन्न उरु देणार नाही आणि याच वचनाचे तो रक्षण करील व आम्हाला तो त्याच्यापेक्षा वेगळे होऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आतापर्यंत आम्ही परमार्थामध्ये जे काही कष्ट सोसले त्याचे आता फळ आम्हाला मिळाले आहे ते म्हणजे असे की आमच्यासाठी काळ आणि वेळ दोन्ही नाहीसे झाले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग